उगवतीचे रंग
Posts
- Get link
- X
- Other Apps
मरावे परी कीर्तिरूपे उरावे...! काल संध्याकाळी फिरायला गेलो असताना नेहमीप्रमाणे काही ओळखीची मंडळी भेटली. त्यातीलच एक बापू. वयोवृद्ध. वय साधारण ७०-७२ वर्षे असेल. पण चालणे तरुणाला लाजवेल असे. आम्ही बसलो आणि गप्पा सुरु झाल्या. आणि कशावरून तरी बापू एकदम गंभीर झाले. म्हणाले, ” सर परमेश्वराला माझी एकच प्रार्थना आहे.मी हा असा चालताबोलता आहे तोवरच त्याने मला न्यावे, मग आज असो की दहा वर्षांनी. पण अंथरुणावर पडणे नको. “ मी म्हटले, “ बापू, तुमचे बरोबरच आहे. प्रत्येकाचीच तशी इच्छा असते. आजारी होऊन, अंथरुणाला खिळून मरण यावे असे कोणाला वाटते ?” मग मी विचार करू लागलो की बापू असे का म्हणाले असतील ? खरे तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण बापूंना मुले, सुना, नातवंडे सगळे आहेत. सुना म्हणजे त्यांच्या लेकीच आहेत. वडिलांच्या मायेने ते सुनांची विचारपूस करतात. मुख्य म्हणजे त्यांना फारसे प्रश्न विचारत नाहीत. घरातील त्यांच्या रोजच्या जीवनात कुठलीही ढवळाढवळ करीत नाहीत. त्यांनी काही विचारले तरच वडिलकीच्या नात्याने सल्ला देतात. त्यामुळे सुना सुद्धा त्यांना आदर...
- Get link
- X
- Other Apps
*** संवादिनी *** ( नमस्कार, आज अक्षय्यतृतीया. या आधी आपणाशी ‘ प्रभातपुष्प ‘ आणि ‘ विचारप्रभात ‘ या सदरातून संवाद साधत होतो. आजच्या शुभ मुहूर्तावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी ‘ संवादिनी ‘ हे छोटेखानी सदर सुरु करीत आहे. रोज नाही जमले तरी अधूनमधून आपल्या भेटीस येत जाईन. आपल्याला आवडेल ही अपेक्षा ! ) कल आज और कल हिंदीत काल आणि उद्यासाठी एकच शब्द आहे. तो म्हणजे ‘ कल ‘. मराठीत आपण काल आणि उद्या म्हणतो. हिंदी आणि अहिराणी बोलीत एक साम्य या बाबतीत मला आढळले. ते म्हणजे अहिराणी भाषेत बोलताना काही लोक उदयाला सुद्धा काल म्हणतात. बहुधा हा काल शब्द ‘ काळ ‘ वरून आला असावा. कालचा दिवस गेला तो भूतकाळ आणि उद्याचा येणारा दिवस तो भविष्यकाळ. आणि आजचा आपल्या हातात असलेला वर्तमानकाळ. लहानपणी मला कोणी एखादी चांगली गोष्ट करायला सांगितली की मी आईशी बोलताना म्हणत असे, ‘ मी उद्यापासून करीन. ‘ उदा. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, रोज नियमाने अभ्यास करणे, घरातील वडिलधाऱ्या मंडळीना नमस्कार करणे इ. पण आई म्हणायची, अरे वेड्या, उद्या कधी येत नसतो. म्हणून जे ...