Posts

Showing posts from December, 2017
****** विचारप्रभात ***** ‘ थोडा है थोडे की जरुरत है ‘      आज आपण सगळ्यांचे अभिनंदन करण्याची पहिली संधी मी घेतो. अभिनंदन यासाठी की माझ्यासह आपणा सर्वांनी नवीन वर्षात पदार्पण केले आहे. खरे तर तुम्ही म्हणाल की यात अभिनंदन करण्यासारखे असे काय आहे ? तसे नवीन वर्षात पदार्पण करायला काहीच करावे लागत नाही. आपण काही करायचे नाही ठरवले तरी आपले नवीन पदार्पण नवीन वर्षात होतेच नाही का ? खरे आहे तुमचे म्हणणे ! पण मित्रहो, अभिनंदन या साठी की आपण सगळे लकी आहोत, सुदैवी आहोत. आपल्याला ही नवीन वर्षाची सकाळ बघायला मिळाली आहे. कालपरवा कमला मिल मध्ये झालेले अग्नितांडव  आठवा. त्यात जी मंडळी आपले प्राण गमावून बसली ती कालपरवापर्यंत आपल्यात होती ना ! दररोज रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु आहे. त्यात ज्यांनी जीव गमावला तेही कालपर्यंत आपल्यासोबत होतेच ना ! म्हणून मी आपल्याला सुदैवी म्हणतो, लकी म्हणतो. आपले अभिनंदनही मी त्यासाठीच केले.      काल ३१ डिसेंबर अनेकांनी अनेक पद्धतीने साजरा केला. ज्याला जसे जमले तसा. कोणी पर्यटनासाठी बाहेर पडले. निसर्गरम्य ठिकाणी ...
***** विचारप्रभात ***** चतुरंग प्रतिष्ठान - एक सांस्कृतिक चळवळ        पुण्यात काही कामानिमित्त गेलो असताना चतुरंग प्रतिष्ठानचे रंगसंमेलन पुण्यात असल्याचे समजले. त्यावेळी योगायोगाने पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव सुरु होता. मला गोव्याच्या सौ उर्मिला देसाई यांच्याकडून या संमेलनाला येण्याबद्दलचे आमंत्रण मिळाले. आणि मी या संमेलनासाठी थांबण्याचे ठरवले. दि. १६ आणि १७ डिसेंबर या दिवशी हे रंगसंमेलन होणार होते.      यापूर्वी चतुरंगची पाच संमेलने मुंबईत, ३ गोव्यात, एक आनंदवनात आणि एक चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या वर्षी चतुरंगने जाणीवपूर्वक हे संमेलन पुण्यात घ्यायचे ठरवले. या संमेलनाची जबाबदारी जाणीवपूर्वक चतुरंगच्या तरुण कार्यकर्त्यांवर टाकण्यात आली, त्याचे कारण म्हणजे नव्या पिढीच्या विचारांना चालना मिळावी, त्यांच्या कार्याला नवकल्पनांचे धुमारे फुटावे. ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक पेलली. नुसती पेललीच नव्हे तर कमालीची यशस्वी करून दाखवली.      पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंडळ या ठिकाणी हे रंगसंमेलन आ...
***** विचारप्रभात ***** ‘ देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती...’ चतुरंग रंगसंमेलनात पुणे येथे दोन ऋषितुल्य व्यक्तीमत्वांचा गौरव करण्यात आला. त्यातील पहिले होते डॉ रघुनाथ माशेलकर आणि दुसरे व्यक्तिमत्व होते डॉ गो बं देगलुरकर यांचे. पहिल्या दिवशी डॉ रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत घेण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी डॉ देगलूरकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एक विज्ञानमहर्षी तर दुसरे ज्ञानमहर्षी. डॉ माशेलकर आज ७५ वर्षांचे आहेत तर डॉ देगलूरकर ८५ वर्षांचे. दोघेही आपापल्या क्षेत्रात आजही कार्यरत आहेत. दोघांचीही स्मरणशक्ती उत्तम आहे. आपल्या ध्येयाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत असणाऱ्या माणसांना परमेश्वर कसे बळ देतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही दोन व्यक्तिमत्वे. कालच्या लेखात मी डॉ देगलूरकर यांचा परिचय करून दिला होता. आज मी डॉ रघुनाथ माशेलकर यांच्याबद्दल बोलणार आहे. उंच आणि सडपातळ शरीरयष्टी, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले डॉ रघुनाथ माशेलकर जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा साऱ्यांनीच या ज्ञानमहर्षींचे टाळ्या वाजवून स्वागत केले. ‘ जडणघडण ‘ या मासिकाचे संपादक असलेले डॉ सागर देशपांडे यांनी ...
***** विचारप्रभात ***** ‘ जीवन त्यांना कळले हो...’      परवा काही कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. त्यावेळी पुण्यात चतुरंग प्रतिष्ठानचे रंगसंमेलन सुरु होते. तेव्हा माझ्या गोव्याच्या एक स्नेही सौ उर्मिला देसाई यांचा निरोप मिळाला की या वर्षी चतुरंगचा कार्यक्रम पुण्यात आहे, तेव्हा जरूर या. चुकवू नका. आणि त्यांनी कार्यक्रम पत्रिका पाठवली. मग मीही ठरवले की काही हरकत नाही. पुण्याचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढवला आणि रंगसंमेलनाला हजर राहिलो. दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होते. कला, क्रीडा आणि साहित्य रसिकांना मेजवानी होती. आणि चतुरंगचे सगळे कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनापासून झटत होते. मी तर हे सगळे कार्यक्रम पाहून भरून पावलो. आणि चाळीसगावला परतताना जणू एक नवीन उर्जा सोबत घेऊन आलो. एका चांगल्या कार्यक्रमाला हजर राहिल्याचा आनंद मला झाला. पण या सगळ्या कार्यक्रमांबद्दल कधी तरी लिहीन.      या कार्यक्रमात मला दोन ज्ञानमहर्षी भेटले. त्यापैकी एक डॉ रघुनाथ माशेलकर. आणि दुसरे डॉ गो बं देगलूरकर. एक विज्ञानमहर्षी आणि दुसरे ज्ञानमहर्षी. पूर्वीच्या काळ...